साहेब शेती करणे गुन्हा आहे काय

🔹शेतकरी नेते अक्षय बोदंगुलवार व विनोद उमरे यांचा प्रश्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.16 जुलै) :- चिमूर तालुक्यातील मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील पांदन रस्ते अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्याने शेतीचे साहित्य देखील नेताना येत नाही फार मोठा त्रास सहन करावा लागतो. चिमूर तालुक्यातील पांदन रस्ते तात्काळ खडीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते अक्षय बोदंगुलवार व विनोद उमरे यांनी केली आहे. आमदार साहेब, खासदार साहेब, पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी साहेब सांगा ना साहेब आम्ही शेती करतो तर हा काय गुन्हा आहे काय असा प्रश्न शेतकरी नेते अक्षय बोदंगुलवार व विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.

शेतावर जाणारे पांदन रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे तथा अनेक गावांमध्ये आजही शेतात जाण्यासाठी चिखलातून प्रवास करावा लागतो. चिखलमय रस्त्याने शेतात जात असताना शेतकऱ्यांना, शेतमजूरआणि जनावरांच्या दुर्घटना झाल्याच्या घटना कित्येकदा घडल्या आहे. शेती मशागतीसाठी लागणारे साहीत्य मालाची वाहतूक करताना रस्ता सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी नव्या रस्त्यांच्या अपेक्षत आहे.