✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.5 जानेवारी):- स्थानिक शेगाव बू येथे दरवर्षी सर्वधर्म समभाव फुले दांपत्य सन्मान दिन व महिला मुक्ती दिन महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच शेगाव यांच्या वतीने. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात येत असतो.
या वर्षी देखील गावात अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.यात ग्राम स्वच्छ्ता मोहीम , सांस्कृतिक कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार . लोकरंग नाट्यकला संगीतमय प्रबोधन मंच ,भद्रावती द्वारा अंधश्रद्धा निर्मूलन ,समाज प्रबोधन कार्यक्रम , रक्तदान शिबिर घेण्यात आले यात 40 सावित्रीच्या युवा मुलांनी रक्तदान करून सावित्रीमाईला अभिवादन केले तर रक्तदात्या युवकांचा खास सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह , सन्मानपत्र , भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिबा फुले , रमाबाई आंबेडकर , फातिमा शेख , बाबासाहेब आंबेडकर , शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढून शोभा यात्रा काढण्यात आली. यात गावातील अनेक युवा युवती विद्यार्थिनी तरुण प्रौढ महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. जय ज्योती जय क्रांती या जयघोषाने शेगाव नगरी दुमदुमली होती.
यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री अविनाश मेश्राम ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव बू , श्री प्रमोद बोंदगुलवार वैदकिय अधिकारी शेगाव बू , ज्योतिताई फुलकर ग्राम पंचायत सदस्य शेगाव , प्रफुल वाढई ग्रा. प. स. शेगाव बू, व अन्य पदाधिकारी हजर होते. यावेळी प्रकाश सोनार्थी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लभाने यांनी केले तर आभार सचिन फुलकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर फुलकर,सचिन रासेकर,महेश फूलकर अरविंद लांजेकर , आणि सर्व फुले दांपत्य सन्मान दीन व महिला मुक्ती दीन महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच शेगाव यांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.