✒️सावरी (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
सावरी (दि.१२ डिसेंबर) चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ४२ गावाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने सावरी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्यागत परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे. त्यामुळे सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे बोलले जात आहे. आरोग्य सेवा सुरळीत राहून रुग्णानां आरोग्य विषय अडचणी निर्माण होणार नाही. म्हणून शासन आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करत असते. ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी या उदात्त हेतूने शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केलेली आहे.
चिमूर तालुक्यातील बिडकर प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात मोठी असून, या केंद्राअंतर्गत जवळपास ४२ गावे व ९ उपकेंद्राचा समावेश आहे. मात्र या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसून वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी सुध्दा राहत नसल्याने रात्रीच्या वेळेस महत्वाचा रुग्ण या आरोग्य केंद्रात आल्यास रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असते. त्यामुळे आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास येत आहे. सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, सचिन घानोडे, नारायण निखाडे, यांनी दैनिक पुण्यनगरी जवळ सांगितले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवस रात्र वैद्यकीय अधिकारी असावेत व ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा द्यावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता लाखो रुपये खर्चून राहण्यासाठी वसाहत बांधण्यात आले आहेत मात्र याठिकाणी कोणीच रहायला तयार नसून. रात्रीच्या वेळेत काही झाल्यास डॉक्टरअभावी रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येण्याचे नाकारता येत नाही. दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राहून दिवस रात्र सेवा दिली नाही तर प्रहार सेवक प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोको आंदोलन करेल असे मत.
विनोद उमरे, प्रहार सेवक यांनी दिले