सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सहपत्नीक कोटेश्वर महादेवाचे घेतले दर्शन

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधि)

पुणे (दि.13 ऑगस्ट) :- 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा)प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे कोटेश्वर मंदिर हे महाराष्ट्रांतील आणि जिल्ह्यातील लिंब गोवे येथे असलेले एक उल्लेखनीय ठिकाण आहे, महाराष्ट्र राज्यांतील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यांत लिंब गोवे हे गाव आहे, त्यात देश किंवा पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रासह एक स्थान आहे.

हे जिल्हा मुख्यालय सातारा पासून उत्तरेकडे 13 किमी आणि राज्यांची राजधानी मुंबई पासून 214 किलोमीटर अंतरावर आढळते, कोटेश्वर मंदिर हे भगवान शिव (भगवान कोटेश्वर) यांना समर्पित आहे आणि सोळाव्या शतकात हे मंदिर बांधले गेले आहे, त्यामुळे ऐतिहासिक जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराला विशेष महत्त्व आहे, श्रावणी सोमवार तसेच महाशिवरात्री अशा धार्मिंक सणासुदीच्या काळात देखील या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीं पाहायला मिळते.

आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमिंत्त सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे आपल्या सहपत्नीक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेतले, यावेळी लिंब गावचे पोलीस पाटील सुरेशराव पाटील यांचे चिरंजीव सचिन सुरेश पाटील यांच्यासह लिंब ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे.