साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील पुल वाहून गेला

🔹अनेक गावाचा संपर्क तुटला

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 जुलै) :- तीन दिवस पासून सुरू असलेल्या मुसळधार मुसळधार पावसा मुळे मौजा साखरा येथील मार्गांवरील पुलाचे काम अर्धवट काम केले अल्यामुळे पुल वाहुन गेला सदर रहदारी ये जा करण्यासाठी जीव मुठीत धरून संघर्ष करावा लागत आहे.

ठेकेदाराने निर्धारित वेळेवर पूल बांधकाम पूर्ण केले नाही त्यामुळे वाहून गेला. असा आरोप माजी सरपंच साखरा तथा विद्यमान ग्रा. प. सदस्य दिनेश मोहारे यांनी केला आहे तालुक्यातील साखरा -आब वडगाव ते कोरा जाणाऱ्या मार्गांवर पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेवर पूर्ण न केल्यामुले तसेच पी डब्लू. डी. ची निष्काळजी मुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.

नागरिकांना जानें्येने साठी रस्ताच नसल्यामुले पुलाला लावून असलेल्या सीडी वरुन पूल पार करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे मुसळधार पाऊस येत आहे परंतु जाणे येणेसाठी अर्धवट पूल अड्सर ठरला आहे. यामध्ये पि डब्लू डी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप साखरा ग्रा. प. चे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. प. सदस्य दिनेश मोहारे यांनी केला आहे.

    मुसळधार पाऊस येत असून रस्त्यांची व पुलांची स्थिती दैनिय झाली असून नागरिकांना जानेयेणेसाठी एक आवाहन च आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसते त्यामुळे साखरा, आब वडगाव येथील नागरिकांना शेगाव,वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा जावे लागते तसेच शाळेच्या मुलाना शाळेत जान्या करीता कोनताही पर्याय नसल्या मुळे शिक्षण बंद आहे .

अनेक गावांना रहदारीसाठी जोडणारा रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराने निर्धारित वेळेत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुले नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.