भद्रावतीत साईबाबा स्थापना महोत्सव साजरा
✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा(दि.23 डिसेंबर) :- स्थानिक बगडेवाडीत नुकताच साईबाबा स्थापना दिन उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी साईबाबा महिला मंडळ बगडेवाडीच्या वतीने श्रीसंत साईबाबा यांच्या जिवन चरित्रावर आधारीत “ साईबाबा एक ईश्वरी अवतार ” ही लघु नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेला उपस्थित प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
या नाटिकेत वीस महिलांसह बालकलाकरांचा सहभाग होता.
नाटिकेत गायक कलाकार – कल्पना बगडे, .विद्या निमकर व गीता पत्तीवार, नृत्य कलाकार – पलक बगडे, गुंजन बगडे, सृष्टी मुळे, दिव्यांगा बिरे व श्रावणी बगडे ,बालसाईबाबा व श्रवण बाळ – राणी बिरे, जेष्ठ साईबाबा – नेत्रा येरमे,
कमलाबाई – नेहा बगडे, मालसापती – सुषमा गोवारदिपे, बायजाबाई – मनिषा नागपूरे, बायजाबाईचे पती माधव व वैद्य- विना गोवारदिपे, भाटिया सरपंच – शितल मुळे, भाटीयाचे साथीदार दगडू व भोंडू – सुनंदा बावणे व शोभा भोगेकर, श्रवणची आई – कल्पना बगडे, श्रवणचे बाबा – रेखा बोरकर, भिकारी – अमित मत्ते, वयस्कर बाई – विद्या दानव, सविता टोंगे व रंजिता खुटेमाटे, चांदभाई – नंदा बगडे . घोडा -सुनंदा बावणे, बालकलाकार यतार्थ बगडे, स्पर्श बांदुरकर ,सिध्दी गोवारदिपे व ओम बांदुरकर यांनी आपआपल्या भुमिका सादर केल्या.
या नाटिकेचे लेखक, संकल्पना व दिग्दर्शक – शालिक दानव, संगीत संयोजन व संचलन -प्रकाश पिंपळकर आणि . रंगमंच व्यवस्था – अनिल बगडे यांची होती.