✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.3 मार्च) :- प्रसिद्ध कलावंत तथा कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांचा मागील दोन दशकांपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व कला क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल तसेच त्यांना यावर्षीचा गोवा राज्य सरकारचा ‘राष्ट्रीय कला शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक, वने व मत्स्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते परमानंद तिराणिक यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला.
सत्काराप्रसंगी मा.मुनगंटीवार साहेब म्हणाले चंद्रपूर सारख्या सांस्कृतिक चळवळीत कार्य करणाऱ्या कलावंतांचा सन्मान गोवा सारखे राज्य करते तेव्हा चंद्रपूरच्या काळ्या सोन्याच्या मातीमध्ये खरे हिरे जन्माला येतात आणि ही शान आज तिराणिक यांनी वाढविली आहे असे ते म्हणाले, यावेळी माजी जि.प.अध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, संजय गजपूरे व अमित चवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थानिक डॉ. श्याम मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते..