सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे करियर गाईडन्स प्रोग्राम 

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.5 ऑगस्ट) :- महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेले विद्येचे माहेरघर बुलढाणा येथील “सहकार विद्या मंदिर ” येथे करिअर गाईडन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. 11 व 12 वि नंतर एंटरन्स एक्झाम आणि पुढे कोणत्या कशातरी करिअर करू शकतो आणि MPSC UPSC प्रीप्रेशन कसं करायचं यासाठी चिखली येथील मयूर ट्रेडर्स चे सर्वेसर्वा श्री मयूर अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी सहकार विद्या मंदिर येथील सर्व विद्यार्थ्यांना करिअर बद्दल योग्य असे मार्गदर्शन केले. 

              सोबत लेफ्टनंट सिद्धेश्वर पैठणे सर यांना चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. NDA आणि ARMY मध्ये प्रवेश कसा घ्यायचा व काय अपॉर्च्युनिटी आहेत याबद्दल पैठणे सरांनी मार्गदर्शन केले. करियर गाईडन्स प्रोग्राम ला सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.