सर्पदंशाने बैलांचा मृत्यू खानगाव येथिल घटना

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.8 डिसेंबर) :- 

आज दि.7| 12 | 2024 रोजी खानगांव येथील शेतकरी श्री.वामन माणिक बावणे यांचा बैल सर्पदंशाने दगावलेला आहे, सविस्तर वृत असे की शेतकरी वामन बावणे हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतीचा हंगाम करून दुपारच्या वेळी बैलाला पाणी पाजुन तणसीच्या ढिगाला बांधले असता विषारी सापाने बैलांच्या तोंडाला चावा घेऊन ठार केले.

 रब्बी हंगामाच्या वेळेवरच शेतकऱ्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे करिता शेतकरी वामन बावणे यांनी शासन दरबारी मदतीची हाक घातलेली आहे.