सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 जुलै) :- स्थानिक शेगाव बू येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे आज सर्पदंशाने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली सविस्तर असे की रात्री जेवण खावण करून रात्रौ झोपी गेल्यावर घरात मण्यार विषारी सापाने घरात प्रवेश करून मृतक नैतिक रामकृष्ण वायदुळे वय ११ वर्ष हा आपल्या वडीला सोबत बाजेवर झोपला असता मणियार विषारी सापाने नैतिक ल चावा घेतला चावा घेतल्याने नैतिक ओरडुन जागा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी काय चावले म्हणून पाहिले परंतु काहीच दिसले नाही पाणी पिऊन पुन्हा ते झोपी गेले.

काही वेळाने पुन्हा नैतिक च्या दुसऱ्या हाताला चावा घेतला . काही वेळाने सापाने चावा घेतला असे समजले तेव्हा उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले परंतु विष त्याच्या शरीरात पसरले असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचे वरोरा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले चंद्रपूर येथील शासकीय उपचार सुरू असता आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू ने गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे चारगाव येथील लाईट ही रात्रौ बे रात्री शुल्लक शा कारणावरून तासनतास जात असते तर रात्री लाईट गेली तर अखी रात्र भर लाईट येत नसते आता पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात रस्त्यावर अंगणात विषारी जीव जंतू बाळगत असते शिवाय येथील वायरमन तसेच कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव नसल्याने हे कर्मचारी आपलीच मनमानी करतात जर का या रात्रीला लाईट असती तर नैतिक ला कशाने चावा घेतला हे समजले असते व वेळेवर उपचार होऊन नैतिक चा जीव वाचला असता नैतिक चे कुटुब अत्यंत हलाखतीचे असून आई वडील रोज मजुरी करून आपले कुटुब चालवीत होते .यातच हे अत्यंत दुःखद घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे तेव्हा पीडित कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.