✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.27 जुलै) :- 25 जून 2024 रोजी सिंदेवाहीहून चंद्रपूरच्या दिशेने येत असताना प्रभाकर दादाजी ठिकरे वय 50 वयाची दुचाकी सिलिप झाल्याने त्यांचा अपघात झाला.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयाचे सिटी स्कॅन मशिन बिघडलेली असल्याने डॉक्टरांनी बाहेरून सिटी स्कॅन करून घेण्यास सांगितले मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने प्रभाकर दादाजी ठाकरे यांना सिटी स्कॅन करणे शक्य झाले नाही. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सिटी स्केन करने अतिआवश्यक होते.
याबाबतची माहिती समाजसेविका सरिता मालू यांना मिळताच त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली व प्रभाकर दादाजी ठिकरे यांचा सिटी स्कॅन खासगी रुग्णालयात केले व इतर आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.समाजसेविका सरिता मालू यांनी वेळेवर आर्थिक मदत केल्याबद्दल ठिकरे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
चंद्रपूरच्या ज्येष्ठ समाजसेविका आणि फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सरिता मालू या आपल्या विधायक आणि प्रशंसनीय कामांमुळे नेहमीच चर्चेत असतात. रणरणत्या उन्हात वाहतूक पोलीस व पोलीस कर्मचाऱ्यांना शीतपेय पुरवणे,पूरग्रस्तांना मदत करणे,
अत्याचारित आणि अन्यायग्रस्त महिलांना शक्य ती सर्व मदत करणे,कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर प्रदान करणे,कडाक्याच्या थंडीत गरीब आणि अनाथांना ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे वाटप,अनाथाश्रमाला आवश्यक वस्तू दान करणे,गरीब आणि अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, पर्यावरण हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी झाडे लावणे, सरिता मालू यांनी धार्मिक स्थळांना दक्षिणा देणे, जीवनावश्यक वस्तू पुरवणे अशी अनेक स्तुत्य कामे केली आहेत. या कामांची दखल घेत समाजसेविका सरिता मालू यांना देशातील नामवंत संस्थांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.