सरकारने शेतकऱ्यांना नुसते आश्वासना देता अनुदान द्या विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 सप्टेंबर) :- सर्वसामान्यांच्या मनगुटीवर महागाईचे भूत बसल्याने नागरिक व शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. मात्र याबाबत सरकार आणि लोकप्रतिनिधी चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊ लागले तरी शेतकऱ्यांना कसलेही अनुदान मिळाले नाही तर राज्य सरकार आश्वासनांचे पाऊस पाडत आहे. शेतकरी, शेतमजूर , सर्वसामान्यांचे प्रश्नाकडे कोणीच बोलताना दिसत नाही. गेल्या अनेक काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत.

जीवनाशक वस्तूंच्या किमती महाग होत आहेत. जीवना आवश्यक वस्तूंचे भाव इतके वाढले आहे परंतु याबाबत कोणीही राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी अजिबात आवाज उठवण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी शेतमजूर जनसामान्यांच्या जनतेच्या समस्या कडे कोणी लक्ष देत नसून सरकारने शेतकऱ्यांची नुसते आश्वासन न देता अनुदान द्यावे अशी मागणी विनोद उमरे यांनी केली आहे.