🔸नैतिक परोधी या ब्रेन ट्युमर आजाराने ग्रस्त बालकास आर्थिक मदत
✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती (दि.25 जानेवारी) :- राजकारण करणे हा माझा निव्वळ हेतू नाही तर समाजसेवा करण्यासाठी राजकारण ही एक प्रभावी पायरी आहे. जोपर्यंत आपण राजकीय क्षेत्रात राहून सत्ता व व्यवस्थेसोबत येत नाही तोपर्यंत समाजातील सर्व घटकांना न्याय देवू शकत नाही. उलट सतत सत्तेसोबत व व्यवस्थेसोबत झगडत रहावे लागते.
आणि म्हणून राजकारण ही समाजकारण प्रभावी करण्यासाठी एक प्रभावी पायरी आहे व या पायरीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे हा एकच ध्यास माझा असेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे म्हणाले.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती व मकरसंक्रांती या पावन सणाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा महिला आघाडीतर्फे दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत हळदी कुंकू व स्नेहमिलन सप्ताह सोहळा सुरु आहे. आज (दि.२५) ला सदर सोहळ्याचा ७ वा दिवस माजरी येथील मातारानी मंगल कार्यालय येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर या होत्या. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, प्रमुख पाहुणे शिवसेना वरोरा तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, माजी नगरसेविका सुषमा शिंदे, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख माया नारले, शिवसेना महिला शहर प्रमुख शीला आगलावे, रवि राय, अनिल सातपुते, विभाग प्रमुख रवी भोगे, प्रमोद ढगे आदी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान नैतिक परोधी या ब्रेन ट्युमर आजाराने ग्रस्त बालकास आर्थिक मदत करण्यात आली.
प्रास्ताविक शिवसेना महिला वरोरा तालुका समन्वयक सरलाताई मालोकार व संचालन महाडोळीच्या सरपंच प्रतिभा मांडवकर यांनी केले.