✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.29 नोव्हेंबर) :- संविधान हा असा एक ग्रंथ आहे की यात सर्वांना सर्वांना समान जगण्याचा राहण्याचा उच्च शिक्षण घेण्याचा व्ययकातिक जीवन जगण्याचा स्वतंत्र प्रदान करतो तर तसेच आजच्या महिला , विद्यार्थिनी , मुलीचे रक्षण देखील आज संविधानच करतो .
कारण मुलीवर होणाऱ्या अत्याच्यावर त्या गुन्हेगार वर कशाप्रकारे सजा द्यायची ही संविधान च ठरवितो कारण स्त्री पुरुष या संविधान ग्रंथामध्येच सर्वांना समान अधिकार दिले आहेत त्यामुळे आजची स्त्री पुरुष हा सुरक्षित आहे. त्यामुळे संविधान चे फक्त वाचन न करून त्यांना अंगीकारले पाहिजे त्यांच्या प्रत्येक पावलावर प्रत्येकाने चालले पाहिजे म्हणजेच संपूर्ण जनता सुरक्षित राहील.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवाचे रान करून अहोरात्र कष्ट सहन करून भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान निर्माण केले या जनतेच्या समान कायद्यासाठी तेव्हा सर्वांनी वाचना ऐवजी अंगीकारले पाहिजे असे मत प्राध्यापक श्री संजय बोधे सर यांनी संविधान दिनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना संविधानाचा आदर करण्याचा संदेश दिला.
डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरेशजी मेश्राम साहेब होते .कार्यक्रमाचे उद्धाटक अविनाशजी मेश्राम साहेब ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन तसेच फूसाटे साहेब उपस्थिती होते या कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शन गित घोष वणी प्रागतीक विचारवंत यानी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमात शहरातील सामाजिक कार्यक्रमात सहभागी असणा-या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आहे तसेच गुणंवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच “भारताच्या ज्वंलत समष्या या विषयावर मूलांची भाषन स्पर्धा ठेवण्यात आली यामध्ये २७ मूंलानी सहभागी घेतला तसेच संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “नागलोक बहूउदेशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा वरोरा सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली .