संततधार पावसाने शेत पिकाचे नुकसान हजारो शेती पाण्याखाली

🔸शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

🔹शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी..राजू चिकटे यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 जुलै) :- गेल्या दोन दिवसापासून सततधार मुसळधार पावसाने शेगाव चारगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने चारगाव धरण चारगाव मध्यम प्रकल्प या धरणाला पूर आला असून परिसरातील छोटे मोठे नदी नाले मोठ्या प्रमाणात ओथंबून वाहू लागले आहे सर्वस्वी या नदी नाल्यामुळे पुरामुळे नदीलगत असलेले अनेक शेती गेल्या दोन दिवसापासून पाण्याखाली आहे सदर शेतामध्ये असलेले सोयाबीन कपास अशा अनेक प्रकारचे पिकं पाण्याखाली असल्याने नाशवंत सढणार असल्याच्या अवस्थेत आहे.

तेव्हा सदर शासनाने शेगाव चारगाव तसेच चारगाव खुर्द धानोली पारोली चंदनखेडा तसेच इरई नदी लगत असलेल्या सर्व शेतीची पाहणी करून तात्काळ घेतल्या पंचनामे करून मुस्कान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती तथा चारगाव खुर्द चे सरपंच तसेच शेतकरी पुत्र युवा काँग्रेसचे कार्यकर्ते श्री राजूभाऊ चिकटे यांनी केली आहे. 

       सविस्तर असे की गेल्या दोन दिवसापासून सततदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मुस्कान झाले यासोबत अनेक शेतकरी पाण्याखाली आहे गेले दोन दिवस लोटून सुद्धा पाण्याचा जोर कमी होत नसल्याने शेगाव चारगाव व येरई नदी लगत शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढत आहे आधीच शेतकरी कर्जबाजारी होऊन आपली शेती पिकविण्याच्या मार्गात आहे परंतु आज अतिवृष्टी चा फटका शेतकऱ्यांना पडत असल्याने शेतपिक धोक्यात असल्याने शासकीय तसेच सावकारी कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ग्रासलेला आहे .

तेव्हा अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तसेच पिकाचे प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तात्काळ रित्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी गेल्या दोन दिवसापासून या परिसरामध्ये ११९ मी. मी. नुसार पावसाने हजेरी लावली विशेष म्हणजे १००मी.मी. च्या वर पावसाने हजेरी लावली तर अतिवृष्टी म्हणून पावसाची नोंद केली जाते परंतु आजच्या नोंदीप्रमाणे या परिसरामध्ये ११९ मी.मी. हजेरी लावल्याने या परिसरामध्ये अतिवृष्टी का घोषित करू नये व झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत का देऊ नये असा सवाल यावेळी येथील सरपंच श्री राजूभाऊ चिकटे यांनी उपस्थित केला.

तेव्हा संपूर्ण प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने वरोरा तालुक्यातील शेगाव चारगाव चारगाव खुर्द धानोली अर्जुनी कोकेवाडा चंदनखेडा व अन्य गावातील पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांना तसेच चारगाव खुर्द येथील सरपंच तसेच शेतकरी पुत्र श्री राजूभाऊ चिकटे यांनी केली आहे.