” संकल्प अर्बन ” शाखा चिखली येथे श्री प्रवीण भाऊ करंडे यांचा वाढदिवस साजरा 

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी) 

बुलढाणा(दि.31 जुलै) :- उदयनगर येथे स्थापन झालेल्या चिखली येथे गेल्या दोन वर्षापासून अविरतपणे सेवा देणारी चिखली तालुक्यातील ग्राहकांचा व ठेवीदारांचा विश्वास संपादन करणारी संकल्प अर्बन चे संचालक श्री प्रवीण भाऊ करंडे यांचा वाढदिवस चिखली शाखेमध्ये साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने महिला बचत गटाला कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय भाऊ करंडे संचालक अशोक काका करंडे व गणेश डवले आणि कौसर भाई व शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कर्ज वाटप करण्यात आलेल्या महिला बचत गटाने व कर्मचारी वर्गाने संकल्प अर्बनचे संचालक प्रवीण भाऊ करंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.