श्री सुरेश गरमडे कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.9 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील एका अल्पशा खेड्यात राहणाऱ्या वायगाव भोयर येथील शेतकरी श्री सुरेश गरमडे यांनी आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करून त्यांनी सोयाबीन वाणाची निर्मिती केली विशेष म्हणजे हे वान पिकिसाठी अधिक असून याचा खर्च देखील कमी आहे त्यामुळे त्यांचे हे सोयाबीन वान अख्या चंद्रपूर जिल्ह्यात नाव लौकीक झाले असल्याने त्यांच्या वानाला अधिक मागणी आहे .

करिता याची दखल घेत . महाराष्ट्र शासनच्या कृषी विभागाच्या वतीने अमरावती विभागीय सर्वोच्य पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे , कृषी सचिव जयश्री भोज , कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, यांच्या हस्ते श्री सुरेश गरमडे, व त्यांच्या सौभाग्यवती यांना मानाचा फेटा , पुष्गुच्छ, सन्मानपत्र , शाल श्रीफळ देऊन सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मधील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया ( डोम) वरळी मुंबई येथे २९ सप्टेंबर रोजी सत्कार करून सन्मानित करण्यात आले.