श्री सत्य साई बाबांच्या आराधना दिवसाचे ओचीत्य साधून रक्तदानाचे आयोजन

✒️संजय तिवारी चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.9 मे) :- 

दि. 30/04/2024 मंगळवार ला भगवान श्री सत्य साई बाबांच्या 🌹आराधना 🌹दिवसाचे औचित्य साधून श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान गिरनार चौक चंद्रपूर येथे सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 22. साई सेवादलानी रक्तदान केले.

या साठी श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र पुर्व जिल्हा चंद्रपूर येथील सर्व पदाधिकारी श्री संजय तनीरवार जिल्हा सेवा समन्वयक, श्री अनिकेत चवले जिल्हा युथ समन्वयक, सौ.चित्रा लोखंडे जिल्हा महिला युथ समन्वयक,

सौर. प्रभा सूर्यनारायण राज्य महिला वेदा समन्वयक, श्री महादेव पारखी वरोरा समिती निमंत्रक, श्री पत्रुजी धारणे पेटगाव समिती निमंत्रक, श्री सुधाकर देवके चंद्रपूर समिती निमंत्रक व साई सेवा दल या सर्वानी श्री चंद्रशेखर मुनगंटीवार जिल्हाध्यक्ष श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र पुर्व जिल्हा चंद्रपूर यांचे उपस्थित रक्त दान शिबीर यशस्वी करण्यात आले. या कार्यात डॉ. पवार व त्यांची चमू शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यानी मोलाचे सहकार्य केले .