श्री संत भोजाजी महाराज शेतकरी गटाच्या पुढाकाराणे तलाठी कार्यालयाचे उदघाटन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.21 सप्टेंबर) :- तालुक्यातील श्री. संत भोजाजी महाराज शेतकरी गट कव्हडापूर च्या समस्त सदस्यांच्या मदतीने तलाठी कार्यालय साजा क्रमांक 36 कवडापूर येथे बिल्डिंग ला स्वखर्च लावुन रंग रंगोटी केली. जुनी बिल्डिंग असल्याने तलाठी अधिकारी ला बसायला जागा नव्हती. तरी संत भोजाजी महाराज शेतकरी गटाने पुढाकार घेउन शेतकऱ्यांना हितासाठी तलाठी कार्यालय उभारले. त्यावेळी तलाठी कार्यालचे उदघाटन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे हस्ते पार पाडले.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य नितीन मत्ते, नवनियुक्त तलाठी फरकाडे मॅडम, शिवदूत बंडुजी डाखरे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, सरपंच चंद्रशेखर चौधरी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन इशांत मांगरुडकर व संचालन तुषार उराडे यांनी केले.

 शेतकरी गटातून एव्हडी मोठी गावाला मदत करणे ही गौरवाची बाब आहे अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले.

त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी पाटील वैद्य,संतोष मांगरुडकर,पोलीस पाटील राकेश मांगरुडकर,गणेश चौधरी,चिंदूजी परचाके, तुषार भडे, देवराव भडे, आदित्य सोनवणे, प्रतीक वरघणे, घुमेश उराडे, कुणाल मंदाडे, समस्त ग्रामवासी उपस्थित होते.