श्री संत नानाजी महाराज तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज पासून चारगाव नगरीमध्ये पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 डिसेंबर) :- स्थानिक चारगाव बूज. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने श्री संत सद्गुरू नानाजी महाराज तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत असतो यावर्षी देखील दिनांक 4 ते 6 तारखे पर्यंत आयोजित केला आहे तरी होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चारगाव बूज वासियानी केले आहे.

सविस्तर असे की बुधवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 4 ते 5 ग्रामसभा, सामुदायिक ध्यान प्रार्थना, रामधुन , श्री कलश चे व पादुका पूजन , श्रमदान, त्यानंतर महिला मेळावा व हळदी कुंकूच कार्यक्रम , व रात्री 9 वाजता एकनाथी भारुड ह. भ. प .सौ . रत्नमाला ताई कोसरे तुमसर यांचा कार्यक्रम याला साथसंगत श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चारगाव बूज इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    तर दिनांक 5 ला सकाळी ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान , 8 वाजता दिंडी व पालखी मिरवणूक , दुपारी 3 वाजता दिंडी सोहळा समारोपीय कार्यक्रम प्रमुख उपस्थिती श्री दयारामजी ननावरे , श्री योगेंद्रसिंग यादव ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव बु. , श्री योगीराज वायदुळे सरपंच ग्राम पंचायत चारगाव बूज , श्री डॉक्टर चांभारे साहेब , श्री आतीश भलमे तंटामुक्त समिती अध्यक्ष , श्री राजेंद्र थूल पो . पा. श्री ईश्वर सोनेकर , काला कमिटी अध्यक्षा श्री महेश शास्त्रकर , सचिव श्री शरदराव भोगेकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .

सायंकाळी पाच वाजता दिंडी भक्तांना भोजनदान अन्नदाते स्वर्गवासी दिनकर भाकरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भाकरे परिवार यांचे कडून , रात्र नऊ वाजता जाहीर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ह. भ. प. श्री पंढरीनाथ ठाकरे मुक्काम वेणी यांचा कार्यक्रम , शुक्रवार दि. 6 डिसेंबर ला सकाळी ग्रामसफाई , सामुदायिक ध्यान चिंतन , अभंगवाणी , दुपारी एक वाजता काल्याचे कीर्तन ह. भ. प . ताजने महाराज यांच्या हस्ते , तीन वाजता गोपाल काला, पाच वाजता दही हंडी व पालखी मिरवणूक , व पाच वाजता महाप्रसाद अन्नदाते श्री प्रकाश मारोती बोधाणे चारगाव यांच्या हस्ते , तरी होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री संत सद्गुरू नानाजी महाराज उत्सव समिती व गावकरी यांनी केली आहे.