श्री मनोज शेळकी यांचा सत्कार

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 ऑगस्ट) :- वखार महामंडळाचा विभागीय स्तरावरील ६७वा वर्धापनदिन कार्यक्रम नुकताच नागपूर पत्रकार क्लब, नागपूर येथे मा. श्री. अनिल बनसोड, उपायुक्त (पुरवठा), नागपूर यांचे अध्यक्षतेखाली, मा. श्री. अजय कडू, उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच मा. श्री. नरेंद्र कुमार, क्षेत्रीय प्रबंधक, भारतीय खाद्य निगम, नागपूर तसेच श्री. निरज थोरात, विभाग प्रमुख, नागपूर यांचे प्रमुख उपस्थीतीत अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी, विभागातील हिंगणघाट, वरोरा, कारंजा (घा) व तुमसर वखार केंद्रावरील सातत्याने शेतमालाची साठवणूक करणारे सन्माननीय शेतकरी ठेवीदार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

 यात वरोरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वडधा चे व्यवस्थापक श्री मनोज अरुण शेळकी यांचा मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

     या शिवाय गुणवंत पाल्य कुमारी आर्या नीरज थोरात हीचा सन्मानपत्र गौरव करण्यात आला या कार्यक्रमास विविध केंद्रावरील केंद्र प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.यात वरोरा वखार महामंडळाचे श्री हेमंत येरगुडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. श्री मनोज शेळकी यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याने परिसरात तसेच त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गानी व मित्र मंडळींनी कौतुक केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री सावरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विभागीय स्तरावरील गठीत वर्धापन दिन सोहळा समितीने पार पाडला.