श्री पुरुषोत्तम डाहुले शिक्षक यांचे निधन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.3 सप्टेंबर) :- स्थानिक चारगाव बूज .येथील गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष तथा चारगाव बूज येथील श्री संत नानाजी महाराज देवस्थान चे युवा कार्यकर्ते श्री अविनाश पुरुषोत्तम डाहुले यांचे वडील श्री पुरुषोत्तम वासुदेव डाहुले यांचे काल दी. २ तारखेला शेतकऱ्याचा मोठा आनंदाचा सण असलेल्या पोळा या शुभ मुहूर्तावर रात्री ८ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आज दि ३ तारखेला दुपारी १२ वाजता अंतिम संस्कार ईरई नदी चारगाव बूज. येथे करण्यात येत आहे . तरी डाहुले परिवार झालेल्या दुःखात सहभागी होण्या साठी सर्व गुरुदेव प्रेमी तसेच गावातील नागरिक तसेच नातलग यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे . 

     स्वर्गवासी पुरुषोत्तम वासुदेव डाहुले हे चारगाव येथील प्रतिष्ठित नागरीक होते याच सोबत त्यांनी संपूर्ण आयुष्य हे शिक्षक म्हणून जनतेची सेवा केली मृत्यू समयी ते ६५ वर्षाचे होते . त्यांच्या पच्यात दोन मुले , दोन सूना , मुलगी जावई , नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या दुखद निधनाने गावात तसेच परिसरामध्ये दुःख हळहळ व्यक्त केले जात आहे.