श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा भव्य जयंती महोत्सव मांढेळी गावामध्ये उत्साहात साजरा

✒️ होमेश वरभे माढेळी (madheli प्रतिनिधी)

माढेळी (दि.12 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील माढेळी या गावामध्ये तेली समाजाचे आरध्यदैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या 399व्या जयंतीनिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून तेली समाज बांधवांच्या वतीने 8 डिसेंबर ला रॅली काढण्यात आली यावेळी चे संतांची जेयघोषाने माढेळीनगरी चा असमंत दुमदुमून निघाला. यावेळी भजन मंडळी ढोल ताशे बँड पथक, घोडा गाडी फटाक्याची आतिषबाजी करीत मुख्य मार्गावरून हजारो महिला, पुरुष, युवक, युवती आदीच्या उपस्थित तेली समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली दरम्यान गावातील प्रत्येक रस्ता रांगोळी व संत जगनाडे महाराज यांच्या फोटो ठेवून सुशोभित करण्यात आला होता.

त्यापूर्वी हरिदास महाराज मंदिर श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी परिसरातील जळका, पवनी, वाघनक, महाडोळी,खरवड वडगाव आदी तेली समाज बांधव तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उस्तफूतपणे रॅली सहभागी झाले यावेळी परिसर जय संताजी जय घोषणे दुम दुमून निघाला गावातील तेली समाजातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सरकारी पतसंस्था चे सदस्य नागरिक आदीच्या पुढाकारातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या समरूपी कार्यक्रम बाजार चौकातील हरिदास महाराज मंदिरात करण्यात आला.

यावेळी विविध कार्यकारी सह. पतसंस्था अध्यक्ष राहुल देवतळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल काटकर, प्रा. अनिल नौकरकर, सेवानिवृत्त शिक्षक संतोषराव बुरुले, पिंटू कुसुरकर,पंकज चंदनखेडे, राजेंद्र धोपटे, माजी ग्रा. प गोपाल देवतळे, होमेश वर्भे, विक्रम चंदनखेडे आदीने संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन संदीप रेवतकर यांनी तर आभार प्रदर्शन ग्रा.पं सदस्य महेश देवतळे यांनी केले यशस्वी साठी तेली समाजातील युवक युवती व नागरिकांनी सहकार्य केले.