श्रीराम नागरी पतसंस्थेची 29 वी वार्षिक आमसभा संपन्न

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा (दि.5 सप्टेंबर) :- गेल्या 29 वर्षापासून संस्थेच्या प्रगतीची घोडदौड पाहता आपल्यालाही अभिमान वाटेल प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या या कौतुकास्पद कामगिरीचा ठसा जनसामान्यावर रुजला असून दिवसेंदिवस लोकांचा या पतसंस्थेवरील विश्वास आपलेपणा वाढत आहे. संस्थेने आपल्या पारदर्शक सर्व समावेशक कार्यपद्धतीच्या जोरावर या स्पर्धात्मक परिस्थितीतही आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान केली आहे.

शहरी भागाव्यतिरिक्त ग्रामीण भागातून सुद्धा ठेवी गोळा करून गरजूंना योग्य तो कर्जपुरवठा करून ग्राहकांचा आढळ विश्वास संपादन करण्यात आपण यश मिळवले आहे. अहवाल वर्ष संस्थेने ठेवी ,कर्ज, सभासद व भाग,भांडवल निधी गुंतवणूक या बाबींमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. होणाऱ्या खर्चात शक्य तेथे काटकसर करून संस्थेला जोही नफा झाला त्यात सभासदांना लाभांश देण्याचा प्रयत्न केला आहे.

            29 वी आमसभेची सुरुवात प्रभू श्री रामचंद्र व स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमापूजन करून कार्यक्रमाध्यक्ष पंडितराव देशमुख प्रमुख उपस्थिती आमदार विकासकन्या श्वेताताई महाले पाटील , आनंदराव हिवाळे अंबिक अर्बन संचालक, सुनील जी वायाळ भाजपा प्रदेश कार्य सदस्य ,सुदर्शन भालेराव संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, रामदास भाऊ देव्हडे भाजपा ज्येष्ठ नेते, जगन्नाथ नाना पाटील माजी सभापती पंचायत समिती, ह. भ .प .प्रकाश बुवा जवंजाळ विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर या मान्यवर मंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने वार्षिक आमसभेला सुरुवात करण्यात आली.

          अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या ज्ञात -अज्ञात दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाध्यक्ष पंडितराव देशमुख यांचे स्वागत शाखा शाहूनगर सल्लागार सेवानिवृत्त प्रा. श्री उत्तम सदाशिव खंडाळकर सर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. आ .सौ श्वेताताई महाले पाटील यांचा सत्कार संचालिका शकुंतला बाहेकर व वैशाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे संचालकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

             अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक श्रीमती मनीषा बोंद्रे यांनी करून समितीतील कामकाजाचे विषय सभासदांच्या संमतीने मंजूर करण्यात आले.2023 -2024 नफ्याचे विनियोजन सर्वांसमोर सादर करण्यात आले संस्थेचे ऑडिट श्री आनंद जेठांनी( सी ए) यांनी केली असून आज पर्यंतच्या नावलौकिक प्रमाणे संस्थेस ऑडिट “अ “वर्ग मिळालेला आहे. संस्थेचे संचालक रघुनाथ पवळ सर , नंदकिशोर गायकवाड , सुभाष पवार या सर्वांचे सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आले. संस्थेचे संचालक सुनील अशोकराव देशमुख यांचे राधाबाई खेडेकर विद्यालय चिखली येथे प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

              श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय पंडितराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील व्यवस्थापक, सर्व शाखा अधिकारी , कर्मचारी वर्ग यांनी हार घालून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नगरपालिका कर्मचारी ,माजी सैनिक, चिखली व्यापारी असोसिएशन , भाजप कार्यकर्त्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .संस्थेचे युवा संचालक चेतन देशमुख तसेच माझी नगरसेवक विजय नकवाल यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

              तालुकास्तरावर पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेले राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलचे व विद्यार्थी व वैद्यकीय प्रवेश मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

            संस्थेचे कर्जदार स्वर्गीय दत्तू माधवराव वाघमारे यांचे निधन झाले असता पाच लाखाचा इन्शुरन्स च्या रकमेचा चेक स्टार हेल्थ इन्शुरन्स प्रतिनिधी प्रशांत भवर यांनी संस्थेचे अध्यक्ष व्यवस्थापक संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्त केला .संस्थेप्रती कृतज्ञता मनोगत गणेश शेळके व सुधाकर भाऊ जाधव यांनी केले. आमदार श्वेताताई महाले यांनी संस्थेचे कार्य प्रगती सेवेबद्दल कौतुक केले आहे. भविष्यात शाळेला डोम देण्याचे अश्वासन दिले आहे.

सर्व मान्यवर मंडळींचे आपले मनोगत व्यक्त केले. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणामध्ये अध्यक्ष यांनी संस्थेच्या प्रगती बद्दल कौतुक केले आहे. सर्व ग्राहकांचे सभासदांचे हितचिंतकांचे आभार मानले.आमसभेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारी संचालक कमलकिशोर लांडगे सर यांनी केले. स्नेहभोजनाने आमसभेची सांगता करण्यात आली.