🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या योगदानातून हजारो रुग्णांवर अत्यंत प्रभावी उपचार
🔸उपचारानंतरही रुग्णाची नियमित विचारपूस
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती(दि.21 मार्च) :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या योगदानातून थोर समाजसेवक श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानांतर्गत विविध ठिकाणी आरोग्य विषयक रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर अत्यंत प्रभावी उपचार केल्या जात आहे.
ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या विश्वस्त सुषमाताई शिंदे आणि ट्रस्टच्या अध्यक्षा रुपाली रविंद्र शिंदे ह्या सर्व रुग्णाची उपचारानंतरही नियमित विचारपूस करीत आहे.
वरोरा व भद्रावती तालुक्यात ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे ( वर्धा ) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य विषयक रोगनिदान शिबिरात हजारो रुग्णांवर विनामुल्य उपचार करण्यात आले. यापैकी कित्येक रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रीयेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे ( वर्धा ) येथे दाखल करण्यात आले.
या रुग्णाचा पुढील उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या योगदानातून करण्यात आला. विशेष म्हणजे भद्रावती तालुक्यातील शेगाव ( खु. ) येथील पाच वर्षीय रुपेश लक्ष्मण गिरडकर या बालकाच्या द्ददयाच्या दोन शस्त्रक्रिया यापूर्वीच करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टर मंडळीच्या सल्ल्या नुसार त्याला पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
विशेषत : शिवानी नक्षीने, शिल्पा भोस्कर, पांडूरंग येरमे, महानंदा भोंगळे, प्रणाली कुत्तरमारे, स्नेहलता चौधरी, वसंता राऊत, शंकर सपाट, सुनंदा सपाट, अंशुमन गाठले, ललीता नागरकर, वृषाली कष्टी , हेमंत नैताम , भैय्याजी मिरगे आणि शामराव राजय्या जुनजीपल्ली या आणि इतर असंख्य रुग्णांना ट्रस्टच्या योगदानातून सावंगी मेघे इथे पाठवून प्रभावी उपचार व काहींवर शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात आल्या.
सर्वच रूग्णांच्या उपचारासाठी दवाखान्यातील डॉ.आर.के. शिंदे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ.रवि, डॉ. माधुरी लोखंडे, डॉ.आदित्या, डॉ. संदिप रेड्डी, डॉ. संदिप पाटील, डॉ. चेतना रुठी आणि डॉ.रजत महावार यांनी उपचार केले.