✒️गजानन लांडगे (यवतमाळ [महागाव] प्रतिनिधी)
यवतमाळ (दि.6 फेब्रुवारी) :- माळ पठारावरील ज्वलंत समस्येला घेऊन शासन व प्रशासन दरबारी अतिशय पोट तिडकीने तांडा वाडी वस्तीवर राहणाऱ्या विमुक्त भटक्या उपेक्षित , वंचित , शोषित , पीडित व शेतकरी , शेतमजूर समाजाच्या उत्थान व उत्कर्षाकरिता अविरत प्रयत्न असणारे *संजय मदन आडे* अत्यंत प्रखर निर्भीड व रोखठोक विद्रोही विचाराचे संजू हे सामाजिक कार्यकर्ते असून *श्री नामा भाऊ जाधव* सारख्या निस्वार्थ व निष्पाप भावनेने कार्य करणाऱ्या तांडा सुधार समितीच्या माध्यमातून व्यवस्थेवर अनेक प्रहार करून सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर राहणाऱ्या या कार्यकर्त्याच्या कार्याला आमचा सदैव पाठिंबा व समर्थन राहिलेला आहे.
निस्वार्थ भावनेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी सांभाळून तो सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतो हे निश्चितच अभिमानास्पद आहे.सातत्याने तो सामाजिक व रचनात्मक विधायक कामाला निरपेक्ष न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न करत असतो.
प्रस्थापित राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला असतानाही त्या सर्व आव्हानांना झुगारून या सर्व आव्हानांना सामोरे जाऊन तो आपले कार्य करत राहतो त्याची ,ही पुरस्कार स्वरूपी घेतलेली दखल सर्वार्थाने योग्य असून एका योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करून या पुरस्काराला खऱ्या अर्थाने सार्थ केले आहे संजू आपल्या भावी वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.