✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.21 सप्टेंबर) :- यावर्षी नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात आलेआहे यात वरोरा तालुक्यात सुरुवातीच्या मृगनक्षत्रात पाऊस पडलाच नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी पावसाला सुरुवात झाली पेरणीसाठी पुरेसा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उशिरा पेरणी केली त्यानंतर काही दिवस पाऊस आलाच नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली .
जेमतेम पिके उगवली असता सततच्या आठ दिवस मुसळधार पाऊस आल्याने जमिनी खरडून निघाल्या त्यात पिके पण वाहून गेली काही प्रमाणात शेतात राहिलेली पिके यांची शेतकरी जोपासना करू लागला त्यानंतर पावसाने तीन ते चार आठवडे दडी मारली त्यात काहीं प्रमाणात पिके सुकून गेली.
त्यात जमिनीला भेगा पडलेले दिसले वातावरणात खूप उष्णता निर्माण होऊ लागली एवढा मोठा दिवसांचा पावसाचाखंड पडल्यानंतर अचानक संपूर्ण आठवडा जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यात ऐलो मोजाक या रोगांनी थैमान घातलं आणि संपूर्ण शेतातील पिके पिवळे पडून सुकायला लागली हाती आलेले पीक त्यात पिकांवर केलेला कीटकनाशक तसेच पेरणी पासून केलेला खर्च वाया गेले असल्याने शेतकऱ्यां मोठं संकट आला आहे तरी संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्याची करावी तसेच शेतकरी यांनी आपल्या शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना धीर द्यावा.