शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयक मार्गदर्शन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.8 मे) :- 

दिनांक ७ मे २०२४ रोजी मौजा नांद्रा येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन २०२३-२४ अंतर्गत गाव पातळीवरील गट प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक श्री.व्ही.पी. काळे, मंडळ कृषि अधिकारी शेगाव(बु), श्री.पी.एस.आडकीने,कृषि पर्यवेक्षक,शेगाव(बु)-१,श्री. जी.के.सवंडकर, कृषि पर्यवेक्षक, शेगाव(बु)-१, श्री.व्ही.डी.घागी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व श्री. पी.एस.मडावी,कृषि सहाय्यक उपस्थित होते.

              यावेळी श्री.घागी यांनी योजनेच्या विविध बाबींची माहिती दिली.आणि नैसर्गिक शेतीचे फायदे, योजनेच्या विविध टप्यामध्ये करावयाची कामे,माती नमुना घेणे,जिओ टॅगिंग करणे,विषयुक्त शेतीमालाचे उत्पादन करणे व उत्पादीत मालाची शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्री कशी करता येईल याची सविस्तर माहिती दिली.

श्री.व्ही.पी.काळे यांनी नैसर्गिक शेती मिशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे व त्यासाठी विविध जैविक निविष्ठाची निर्मिती व वापर करून शेतीवरील खर्चात बचत करणे आणि जमीन तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे. आवश्यक असल्याचे सांगितले.

श्री.आडकीने यांनी विविध जैविक निविष्ठाची माहिती देऊन दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.श्री. सवंडकर यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री.मडावी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नांद्रा व बोरगाव भोसले येथील शेतकरी उपस्थित होते.