✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.6 जानेवारी) :-
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. देशा स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाली.या ७६ वर्षाच्या काळात अनेक पक्षाचे सरकार या देशात आल्या व सत्तेचा उपयोग घेतला आहे.या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजकारणी उद्योगपती व्यवसायिक व कर्मचारी यांची खेरिजा सामान्य माणसाचा विचार करणारी सरकार या भारत देशात आली असे म्हण्यास ते सर्व चुकीचे ठरेल. मात्र काही अपवाद आहे उत्तम शेती ,मध्यम व्यापार ,कनिष्ठ चाकरी म्हणजेच नोकरी सर्वात खालच्या स्थानी पाहिल्या जात होते.
त्या नोकर वर्गाची आज या भारत देशामध्ये भरभराटी असल्याने जो युवक शिक्षण घेतो तो नोकरीच्या मागे लागतो या हव्यासा कोटी बेरोजगार होतो त्या आपल्या नोकरी लागणार नाही म्हणून काही युवक कडे व्यवसाय करण्याकरिता भांडवल नाही. काही त्याची पारंपारिक असलेली शेती करतात तर त्यांनी शेतीच शेतीच नाही ते नाईलाजाने मिळतील ते काम करतात व पोट भरतात त यातही अपवाद काही असे आहेत की ते शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत अशा बेरोजगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे.या बेरोजगारी काही उपयोजना करण्यात आलेल्या आहेत काय ? याचा सत्ताधारी व विरोधक यांनी विचार करायला पाहिजे मात्र माझ्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. बरीच नेते मंडळी आम्ही सर्वसामान्यांचे नेते असून आम्ही सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करत असल्याची भाषणे ठोकतात त्यांना काहीच वाटत नाही.
क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून बेरोजगारी कमी व्हावी यासाठी तसेच त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येत आहेत. किंबहुना स्वातंत्र्याला ७६ वर्ष पूर्ण होऊन सुध्दा शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.यावर शेतकऱ्यांच्या भरोषावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधी विधानसभेत, संसदेत प्रश्न उपस्थित करत नाही मात्र हेच मोठे अभिमानाने आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहेत.असे खोटारडे भाषण करत असतात आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी होत असे स्वतःलाच शेतकरी नेते घोषित करतात.
नेत्यांना पक्षाचे भाडोत्री दलाल म्हटलं तर अतिशोक्ती ठरणार काय? शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चा मध्ये मोठी वाढ झाली मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात कोणत्याही नेत्याने वाट केली नाही तर हीच शेतकरी नेत्यांचे कर्तव्य आहे काय? हे नेते विकास कामे म्हणजे मोठी सडके प्रशासकीय इमारती निर्माण करणे हाच विकास समजतात मात्र या देशातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पादनात वाढ करणे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून रोज बेरोजगारी कमी करणे आरोग्यसेवा कमी खर्चाच्या करणे चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे.
शेतीवरील खर्च दिवसें दिवस वाढ होत आहे तर त्याच्या उत्पादन मालाला भाव कमी ही या देशाची मोठी वास्तविकता असून या नेत्याच्या स्वार्थापोटी करतात येणाऱ्या राजकीय वृत्तीच्या दाखल असून शेतकऱ्यांचे कैवारी कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोरच नाही तर शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्व वैचारिक नागरिकापुढे उपस्थित होतोय.