शेगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,सत्कार समारोह कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न Competitive examination guidance, felicitation ceremony at Shegaon Kargil Victory Day program concluded

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी) 

शेगाव बू (दि.28 जुलै) :- चंद्रपूर जिल्हा पोलिस दल तर्फे जनजागृती अभियाना अंतर्गत शेगाव (बु) पोलिस स्टेशन, पोलिस पाटील तथा शांतता समिती यांचे संयुक्त विद्यमाने 28 जुलै ला कारगिल विजय दिवसा निमीत्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी लॉन, शेगाव बु, चंदनखेडा टि पॉईंट येथे सकाळी ११.०० वाजता आयोजीत कार्यक्रम पार पडला.

           पोलिस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र सिंह परदेशी (भापोसे) यांच्या संकल्पनेतुन पोलिस विभागा तर्फे जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेसी (भापोसे) यांनी विद्यार्थी यांना कोणतेही काम करत असताना मन लावून केले पाहिजे. मोबाईलचा कमीत कमी उपयोग करून अभ्यासाकडे लक्ष केले पाहिजे.

स्वतःचे लहानपणीचे उदाहरण देऊन विद्यार्थी यांना ध्येय समोर ठेवून खुल्या डोळ्याने स्वप्न पाहून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी (भापोसे) वरोरा विभाग यांनी आपण जे ही काम करतो ते प्रामाणिक पणाने केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासामध्ये सातत्य, जिद्द चिकाटी असली पाहिजे.

अपयशाने खचून न जाता त्यालाच यशाची पहिली पायरी समजून पाहिलेले स्वप्न यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर विभाग यांनी सायबर क्राईम, मोबाईल चे दुष्परिणाम, समाज विघातक मॅसेज ग्रुप वर आल्यास ते इतर लोकांना न पाठवता त्याला डिलीट करावे असे प्रतिपादन केले.

अनुप कुमार संचालक नालंदा अकॅडमी वर्धा यांनी देशातील व विदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश घेण्याकरिता काय करावे कुठली परीक्षा द्यावे, अभ्यास कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. पोलीस आमदार मुजाबीर अली यांनी सायबर क्राईम, महिला विषयक कायदे यावर सर्विस्तर तर मार्गदर्शन केले.  

 गिरोला येथील छोट्याश्या गावातून पोलिस उप निरीक्षक पदी निवड झालेल्या तनुजा खोब्रागडे हीचा तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतून विविध शासकीय नोकरीत लागणाऱ्या विद्यार्थी प्रतीक ढुमणे रा. सावरी, माधुरी रा. सावरी, पूर्वा घानोडे रा. सावरी, प्रदीप मस्के रा. लोधीखेडा, सतीश जीवतोडे रा पे, नितेश श्रीरामे रा. पे, प्रा विजय गाठले रा. चारगाव बू.

चेतन ननावरे रा. मानोरा, अमित चौधरी रा. गुंजाळा, अमोल ननावरे रा. दादापूर, अन्नपूर्णा वर्भे रा. हिरापूर, श्रीकांत ननावरे रा. भटाळा यांचा सत्कार पुष्पगुच्छ शिल्ड देऊन आदरणीय पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच पोलीस स्टेशन शेगाव बू अंतर्गत जून महिन्यात उत्कृष्ट काम करणारे पोलीस आमदार सुरेश आखाडे, निखिल कौरासे, वैशाली हेमके आणि पोलीस पाटील गीरोला मनीषा बल्की, पोलीस पाटील पोहा चंद्रशेखर टापरे यांचा सुद्धा सत्कार सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शिल्ड देऊन आदरणीय पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस स्टेशन शेगाव बु चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन पोलीस पाटील कोड बाळा दीपक निबरड यांनी केले तर आभार शांतता कमिटी सदस्य गजानन ठाकरे यांनी मांडली.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता पोलीस स्टेशन शेगाव येथील सर्व पोलीस अंमलदार, पोलीस पाटील आणि शांतता कमिटी सदस्य शेगाव बु प्रयत्न केले. नेहरू शाळा शेगाव चे मुख्याध्यापक धाकुलकर सर, कन्या विद्यालय शेगाव चे मुख्याध्यापिका भजभुजे मॅडम, भारत विद्यालय चारगाव बु चे मुख्याध्यापक सोनारकर सर, सर्वोदय विद्यालय अर्जुनी चे मुख्याध्यापिका जुनघरे मॅडम, किसान विद्यालय आष्टा चे मुख्याध्यापक बेहरे सर यांनी विशेष सहकार्य केले.