✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.27 जुलै) :- चंद्रपूर जिल्हा पोलिस दल तर्फे जनजागृती अभियाना अंतर्गत शेगाव (बु) पोलिस स्टेशन,पोलिस पाटील तथा शांतता समिती यांचे संयुक्त विद्यमाने 28 जुलै ला कारगिल विजय दिवसा निमीत्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी लॉन, शेगाव बु, चंदनखेडा टि पॉईंट येथे सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात करण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र सिंह परदेशी ( I PS) यांच्या संकल्पनेतुन पोलिस विभागा तर्फे जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच अनुशंगाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून शेगाव (बु) पोलिस स्टेशन,पोलिस पाटील तथा शांतता समिती यांचे संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, तथा मान्यवरांचे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गिरोला येथील छोट्याश्या गावातून पोलिस उप निरीक्षक पदी निवड झालेल्या तनुजा खोब्रागडे हीचा तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतून विविध शासकीय नोकरीत लागणाऱ्या विद्यार्थ्यांचा, जून महिन्यात उत्कृष्ट काम करणारे पोलिस अमलदार आणि पोलिस पाटील यांचा सत्कार घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पोलिस अधिक्षक चंद्रपूर रविंद्र सिंह परदेशी ( I PS), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी (IPS) उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर राकेश जाधव राहणार आहे.
तसेच देश विदेशातील नामांकित विद्यापिठा मध्ये प्रवेश कसा घ्यायचा तथा स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे मार्गदर्शक नालंदा अकादमी वर्धा चे संचालक अनुप कुमार हे करणार आहेत. सायबर क्राईम, महीला विषयक कायदे, रोड सेफ्टी, पोलिस काका आणि पोलिस दीदी ची माहिती देण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहुण लाभ घेण्याचे आवाहन शेगाव ( बु) पोलिस स्टेशन, पोलिस स्टेशन क्षेत्रातील पोलिस पाटील तथा शांतता समिती तर्फे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.