शेगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाणवाटप

🔸वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

🔹हळदी-कुंकु कार्यक्रम सोहळा उपक्रमातील विधानसभा क्षेत्रातील हा सहावे कार्यक्रम

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.30 जानेवारी) :- स्थानिक शेगाव बू येथे आज (दि. 29) ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या सौ.रश्मीताई ठाकरे यांच्यासूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून, चंद्रपुर -आर्णी लोकसभा निरिक्षक तथा माजी नगरसेवक शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांचे निरीक्षणात ,प्रा.शिल्पा बोडखे यांच्या संकल्पनेतून, , जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े,वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, युवासेना जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे, युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांचे सहभागाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20 टक्के राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा व चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे या हेतूने हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

 कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सोबतच महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा असुन प्रमुख मार्गदर्शक 

वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, उपतालुका प्रमुख अभिजीत पावडे, विभाग प्रमुख चंदशेखर कापटे, उपविभाग प्रमुख श्रीकांत दडमल, शहरप्रमुख गजानन ठाकरे पदाधिकारी मान्यवरासोबतच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे मेसा सरपंच मनिषा जिवतोडे, अर्जुणी सरपंच सोनाताई हनुवते, सोनगांव सरपंच तेजस्वीनी बुऱ्हान, खेमजई सरपंच मनिषा चौधरी, शेगाव सदस्या रेखा दडमल व इतर गणमाण्य प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या.

 शेगाव येथील हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाला मंचावर उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच स्त्री शक्तीचे महत्व पटवून दिले.

 सदर कार्यक्रमाकरीता वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, महिला आघाडी व युवतीसेना पदाधिकारी प्रिती लांजेकर, शुभांगी अहिरकर, वंदना फुलझेले, मनिषा पुसनाके, शालू भलमे, प्रणालीताई मडकाम, तेजस्वीनी चंदनखेडे, स्नेहलता वैद्य, शारदा नागपूरे, अमिषा पटेल, सारीका ठाकरे, पुष्पांजली कापटे, पुजा गजभे, कमल ढवस तसेच इतर महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सफलतेकरीता मेहनत घेतली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर यांनी केले तर संचालन युवतीसेना जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर यांनी सांभळले. हर्षोहल्लासात शेगाव येथील हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा महिलांचा उपस्थितीत सफलतापुर्वक संपन्न झाले.