🔸चिमूर वरोरा हायवे चे अर्धवट काम लवकर पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणी साठी नागरिक उतरणार रस्त्यावर
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी )
शेगाव बू (दि.12 डिसेंबर) :- मागील ७ वर्षां पासून चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ ई. चे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी मोठामोठे गड्डे आहेत. तसेच अनेक ठिकाणी आजही पुलाचे काम अर्धवट स्वरूपात पडलेले आहे.
या मुळे कित्तेक लोकांना यात आपला जिव गमवावा लागला आहे. तर काहींना कायम स्वरूपाचे अपंगत्व आले आहे. त्यातच भर म्हणून रस्त्याचे काम करणारी एस. आर. के. कंपनी कडून मागील २ महिन्या पासून काम पूर्णतः बन्द आहे. परंतु प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी अजून पर्यंत याची दखल घेतलेली नाही.
यामुळे आता त्रस्त गावाकरी तथा परिसरातील नागरिक यांनी जिल्हाधिकारी, एस. पी., तहसीलदार यांना निवेदन देऊन ८ दिवसात काम सुरू करा अथवा चक्काजाम आंदोलन केल्या जाईल अशा स्वरूपाचे निवेदन दिले होते. परंतु ८ दिवसाची मुदत संपून सुद्धा कुठलीही हालचाल न झाल्यामुळे येत्या १३ डिसेंबर २०२३ ला शेगाव बु येथे बस्टॉप जवळ शेगाव वासिय तथा परिसरातील त्रस्त नागरिकांन काडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.