शेगाव बू येथे शेतकऱ्यांना दूध उत्पादकता क्षमता बांधणी कार्यक्रम

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.1 ऑगस्ट) :- एम ३ एम फांउडेशन व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर , यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपजीविका विकास कार्यकम प्रकल्प अंतर्गत दुध उत्पादकांची क्षमता बांधणी कार्यक्रम शेगाव (बु.)येथे पार पाडण्यात आला.

 कार्यक्रमात पशुधन विकास अधिकारी डॉ.सतीश अघडते ,कृषी विकास प्रकल्प समन्वयक कुंदन राणे,टीम लीडर रोशन माणकर, वाडी प्रकल्प व्यवस्थापक संतोष गुजर,वाडी प्रकल्प व्यवस्थापक सचिन पाटील,वनधन शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सुधीर नन्नावरे,दशरथ देहारकर,प्रकल्प कृषी अधिकारी प्रबुद्ध डोये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात शेगाव (बु.) परिसरातील असलेले खेमजई,भटाळा,आसाळा,शेगाव, (बु.)शेगाव खु.,दादापूर,अर्जुनी,वायगाव (ख)चारगाव बु,चारगाव खु,मेसा,बिजोनी,कोकेवाडा येथील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.अघडते पशुधन विकास अधिकारी यांनी दुध शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

त्यामध्ये दुधाळ गाईची योग्य प्रजाती ची निवड करणे त्यांच्या जनावरांचे व्यवस्थापन,आजार व त्यावरील उपचार ,जनावरांचे आहारामध्ये खाद्यासाठी कमी खर्चात नेपियरची लागवड करणे , मिनरल,कॅल्शियम वापरणे त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढून त्यांचे उत्पन्न देखील वाढेल सोबत शेगाव येथील अनेक वर्षापासून मदर डेअरी दुध केंद्र चालवत असलेले गजानन ठाकरे यांनी सुद्धा जनावरांना बद्दल काळजी व नियोजन योग्य प्रकारे करून योग्य जनावर निवडून व्यवसायात वाढ व्हावी असे सांगितले .

कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी अनिल पेंदाम यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश चौधरी यांनी केले सोबत कार्यक्रमात तालुका समन्वयक दीक्षांत राऊत ,निकलेश चौधरी , प्रफुल जुमडे, विशाल मन्ने व मनोज वरभे यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.