✒️आम्रपाली गाठले शेगांव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.10 मार्च) :- वरोरा तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत तसेच बाजारपेठ असलेले शेगाव बु हे गाव असून तालुक्यात 13 सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे ग्राम विकासासाठी व ग्राम स्वच्छतासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपयांचा निधी सरकार मार्फत पुरवण्यात येत असतो, परंतु स्वच्छतेकडे ग्रामपंचायतला विसर पडला असून ठिकठिकाणी प्लास्टिक, बॉटल नाली मध्ये सांडपाणी सिमेंट रस्त्यावर सांडपाणी वाहत असुन याकडे ग्रामपंचायत लक्ष नसल्यामुळे गावामध्ये मच्छर व बिमारीचे प्रमाण वाढताना शेगाव मधील दिसत आहे .
शेगावला रोज हजारो नागरिक परिसरातील ग्रामीण भागातून रोज येत असतात तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे परंतु याच शेगाव ग्रामपंचायतचे गावाच्या विकासकामाकडे व ग्राम स्वच्छतेकडे पुर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेगाव मध्ये ठिक ठिकाणी गावातील नाल्यात पाणी साचलेले अवस्थेत असल्यामुळे मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले असुन लहान मुले जास्त प्रमाणात याचे बळी पडत आहे. गावामध्ये काही अंगणवाडी च्या बाजुलाच केर कचऱ्याचा मोठे मोठे ढिग पडलेले असुन ठिकठिकाणी सांडपाणी सुद्धा साचलेले आहे.
परंतु शेगाव ग्रामपंचायत ला याचे कुठल्याही प्रकारचे घेणेदेणे नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता शेगाव ग्रामपंचायतच मच्छर पालन व्यवसाय तर सुरू केला की काय असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.