शेगाव बूज येथे जशने इदमिलाद्दून नबी उत्साहात साजरी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 सप्टेंबर) :- ईद -मिलादुन- नबी(मो पैगंबर यांच्या जन्मदिनी) शेगाव बुद्रुक येथील सर्व मुस्लिम व पैगामी रजा सेवा संस्था जमा मज्जिद शेगाव बु यांच्या वतीने 15. 9. 2024 ला रोज रविवार संध्याकाळी 8वाजता ते 10 वाजेपर्यंत गावातील मुस्लिम मुलांचा नाते शरीफ चा प्रोग्राम घेण्यात आला व त्यामध्ये एकूण 36 मुला-मुलींनी भाग घेऊन त्यांना पैगामी रजा सेवा संस्था व मुस्लिम बांधवाकडून बक्षीस देण्यात आले .

त्यानंतर 16.9.2024 रोज सोमवार या दिवशी सकाळी आठ वाजता पासून मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचे औचित साधून पूर्ण गावातील प्रमुख रस्त्याने पूर्ण मुस्लिम मुले मुली व बांधव यांनी मिरवणूक काढून गावातील पूर्ण एजा पुण्याच्या सर्व लोकांना खीरचे वाटप करून सर्व धर्म समभाव चे प्रतीक दाखवून मोहम्मद पैगंबर यांचे जन्मदिवस खूपच आनंदात साजरा केला व त्यानंतर 12 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद मसालेभात चे वाटप केले.

या मध्ये श्री योगेंद्र यादव ठाणेदार शेगाव बुद्रुक श्री पडोले श्री सुरजुसे श्री आखाडे सर व त्यांचे पूर्ण सहयोगी यांचे पैगामे रजा सेवा संस्था व सर्व मुस्लिम बांधव यांनी त्यांचे आभार मानून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला व शांतते पूर्व कार्यक्रम पार पडला श्री बशीर कुरेशी, शेर खा, पठाण हंसार शेख, मुज्जमिल शेख, डॉक्टर पठाण सलाम शेख व मज्जिदचे मौलाना हाफिज मोईन हाफिज वकील हे उपस्थित होते.