✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू(दि.8 ऑक्टोबर) :- चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोरा भद्रावती मतदार संघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे , मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन , प्रेरणेतुन प्रगति, नवरात्रोत्सवात जागृत व्हा तरुणांनो असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत , या मोहिमे अंतर्गत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु शेगाव बु येथे दिनांक ६ आॅक्टोंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.
या शिबीराला शेगाव बु ‘ धानोली , दादापूर , महालगांव , मेसा , सालोरी , वडधा , बोरगाव , सोनेगांव , उमरी या गावातील ९८३ नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
या कार्यक्रमाचे उदघाटन बालाजी ढाकुणकर,यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्विनी बुराण,नितीन खंगार,मोहित लभाने,विद्या खाडे,चंद्रहास मोरे,अभिजीत पावडे,अनिल चांगले,शेरखाॅ पठान,विवेक गोवारदिपे,बाबा खाटीक,दशरथ देहारकर,वसंत निखाडे,नरेंद्र कन्नाके,अक्षय बोंदगुलवार,हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक कामेश कुरेकार,, संचालन संतोष भोयर, आभार प्रदर्शन संयोग कुकूडकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम व ईश्वर वाभिटकर,विश्वनाथ दांडेकर,वेद ठावरी, मनिष हनवते, सचिन खुटेमाटे,भूषण साखरकर ,किरण चौधरी,काजल पाटील,पुनम झाडे,स्नेहल नंदनवार,दिक्षा साखरकर,कल्याणी कापटे,तनु कन्नाके,रक्षा कुंदनकर,अथक प्रयत्न केले.