🔹अवैद्य रेती उत्खनन, वाहतूक, गौण खनिज उत्खनन, सट्टापट्टी, अवैध दारू विक्री यांच्यावर अंकुश लावण्याचे आव्हान
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू. (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.18 जानेवारी) :- वरोरा तालुक्यातील मोठे पोलीस स्टेशन म्हणुन ओळखले जाणारे शेगाव पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक श्री शैलेन्द्र ठाकरे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला असून जवळपास 102 गावाची धुरा त्यांच्या खांद्यावर वर आलेली आहे..
स.पो.नी. शैलेंद्र ठाकरे हे मूळ तुमसरचे असून आतापर्यंत त्यांनी अचलपूर, अंजनगाव,यवतमाळ, अकोला,बल्लारशा सायबर गुन्हे शाखेत कार्यभार सांभाळला असून बल्लारपूर येथे त्यांची ओडख त्यांची ख्याती सर्वांच्या परिचयाची होती तसेच त्यांचा दरारा देखील विशेष होता करिता शेगाव वासिय त्यांच्याकडे शेगाव पोलीस स्टेशन स.पो. नि.म्हणून आलेली जबाबदारी ही आव्हानात्मक असली तरी सुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्य अधिकाऱ्याच्या योग्य वापर केला तर त्यांच्याकडून सर्वसामान्य ग्रामीण जनतेला निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे..
शेगाव परिसरात सुरू असलेले आईव्यध्य धंदे अवैध्य रेती तस्करी उत्खनन, वाहतूक, गौण खनिज उत्खनन, सट्टापट्टी, अवैद्य दारू विक्री,यावर अंकुश लावण्याचे त्यांच्या समोर फार मोठे आव्हान आहे ते कशाप्रकारे स्वीकारतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे..