✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.19 जुलै) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या व पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चंदनखेडा जवळील शेगाव चंदनखेडा मार्गावरील छोट्याश्या पुलावरून काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील सर्व नदी नाले ओथंबून वाहू लागले त्यामुळे या पुलावरून देखील बेधडक वाहत होते . दरम्यान एक ट्रक चालक याने आपला जीव मुठीत धरून हिम्मत एकजूट करून या पुलावरून ट्रक समोर चालविण्याचे धैर्य केले परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रकला वाहत्या पाण्याने बाहेर फेकून दिले तेव्हा ट्रक हा पुलाखाली कोसळला.
तेव्हा आरडा ओरड करण्यात आली परंतु कुणीही पाण्यात जाण्याची हिम्मत करीत नव्हते तेव्हा तेथील ट्रक चालक याचा जीव धोक्यात असल्याने याची माहिती स्थानिक शेगाव बू. या मिळाली असता येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले . व नागरिकांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक चालक याचे प्राण वाचवले. सविस्तर असे की चंदनखेडा ते शेगाव या मार्गावर एक अरुंद पुल आहे छोट्या मोठ्या पावसाने या पुलावरून पाणी वाहू लागते व पुर येत असतो.
यात HR 73 b 4786 आयशर सहा चाकी ट्रक याचा चालक श्री गोविंद पद्मसिंह याने भर वाहत्या पाण्यातून ट्रक काढण्याचा निर्णय घेतला परंतु वाहत्या पाण्याचा जोर प्रवाह जास्त असल्याने ट्रक पुला खाली घसरला व खाली कोसळला यात ट्रक चालक चा जीव धोक्यात असल्याने ठाणेदार योगेंदर सिंग यादव यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रक चालक गोविंद पद्मसिंह याला सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याची प्रकृती विषयी विचारपूस करून त्याला उपचार करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले. विशेष म्हणजे या कौतुकास्पद कार्यामुळे शेगाव पोलिसांचे तसेच ठानेदरचे कौतुक केले जात आहे.