🔹रस्त्याच्या भेगा ठरत आहे अपघाताला आमंत्रण देणाऱ्या
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बु.(दि.15 एप्रिल) :-
वरोरा शेगाव चिमूर नॅशनल महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून एस आर के कंत्रक्षण कंपनी कडे असून यांच्या अनेक हलगर्जी पणा मुळे या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून सदर या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी केव्हाचा संपला असून सदर एस आर के कांट्रक्षण कंपनी ही तोट्यात असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे ही कंपनी आपली वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रस्त्याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे करीत असून चाल ढकल काम करीत असून ये जा करणाऱ्या जीवाशी दररोज खेळत असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे ..
तर वरोरा शेगाव खेमजई या टी पाईंट वर दररोज दोन तीन छोटे मोठे अपघात होत असल्याचे येथील दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने बघत आहे . या टी पाईंट या चौकात रस्त्याचे काम निष्कृष असून शेगाव वरून खेमजई जाणारा रस्ता पूर्ण पने दबला गेला आहेे.
शिवाय यात पाच इंच ते सहा इंच उंची वाढली असल्याने खेमजई कडे जाणारे दुचाकी वाहने दररोज स्लीप होऊन भर रस्त्यावर पडतात त्यात त्यांना भरगच मार देखील लागतो परंतु भविष्यामध्ये या चौकात सर्वाधिक मोठा अपघात होण्यास नाकारता येत नाही..
करिता भविष्यात होणाऱ्या अपघाताला निमंत्रण मिळावे करिता येथील नागरिकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तरी देखील हे कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देऊन त्यांना हलकवणी लावतात.
तेव्हा संतापाने बेभान होऊन येथील माजी सरपंच तथा ग्राम पंचायत येथील सदस्य श्री यशवंत लोडे यांनी कंपनीच्या मुख्य कर्मच्याऱ्याशी बेधडक बोलून ही गॅप ह्या भेगा तात्काळ बुजवून रस्ता पूर्णपणे सुरळीत रित्या गुळगुळीत करण्यात यावा अशी मागणी केली.
शिवाय या रस्त्याचे काम दोन दिवसात रीतसर पूर्णपणे सुरळीत पूर्ण न केल्यास मी स्वतः जेसीबी यंत्र लाऊन या रस्त्याचे खोदकाम करीन असा इशारा दिला असून स्थानिक पत्रकारशी बोलणी केली …