शेगाव (खुर्द) येथील घुमे बंधुनी केली अवलीया रुपातिल व्यक्तीची सेवा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.12 सप्टेंबर) :- 

काल दिनांक ११ सप्टेंबर ला सकाळी ९ वा.भद्रावती तालुक्यातील शेगांव खुर्द येथील पवन घुमे व त्यांचे लहान बंधू विवेक घुमे या दोघांनी बाहेर राज्यातुन फटकलेल्या अवलीया रुपातिल पेठ सावंगी उस्मानाबाद येथील एक व्यक्ती शेगांव खुर्द येथे अवलिया रुपात दिसताच क्षणी कसलाही विलंब न करता ,त्याची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून घुमे बंधुनी त्याच्या वाढलेल्या जटा कापुन दिल्या .

त्याची अंघोळ करून दिली,नविन कपडे घालावयास घेवून दिले, नविन चप्पल दिली, भोजनाची व्यवस्था स्वतः करून दिली,व त्या अवलिया रुपातील व्यक्तीच्या चेहरा्यावरील हास्य निर्माण केले. त्या व्यक्तीला झालेला आनंद बघुन घुमे बंधू नी प्रभुची सेवा हिच ईश्वर सेवा असे मत व्यक्त करीत समाधान मानले .