शेगाव (खुर्द)येथे पार पडले रक्तदान शिबीर

🔸जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे उ.बा.ठा.यानी रक्तदान करून दिल्या विवेक घुमे ला शुभेच्छा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 सप्टेंबर) :- येथून जवळच असलेल्या भद्रावती तालुक्यातील शेगांव खुर्द येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार ला . सामाजिक कार्यकर्ता विवेक विठ्ठल घुमे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उद्धाटकन मुकेशभाऊ जिवतोडे जिल्हा प्रमुख (उ. बा. ठा.) हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मोहित लभाने होते.पोलिस पाटील स्वाती विजय नन्नावरे. उपसरपंच्या उषा विनोद जिवतोडे .तं.मु.स.अध्यक्ष चंद्रशेखर भिवधरे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव विठ्ठल घुमे.आदि गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनीं उपस्थित होत्या.

त्या शिबिरात परिसरातील युवा वर्गानी स्वइच्छेने येवून रक्तदान करून विवेक घुमे ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.संचालन राजु मांडवकर यांनी केले.प्रास्ताविक विवेक घुमे तर आभार सानिका भिवधरे नी मानले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष हनवते,पवन घुमे, संदिप गौरकर, आकाश नागेकर,सुरज धांडे,धनराज भागडे,प्रणय पेचे,मनोज चौधरी ,सागर कामटकर , अभिषेक मानकर , कुणाल क्षिरसागर , आदिनी सहकार्य केले.