शिवाई विद्यालय तथा कॉलेज मध्ये वृक्षदिंडी व आषाढवारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

✒️सारंग महाजन बुलढाणा(Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.17 जुलै) :- शिवाई शिक्षण संस्थेच्या शिवाई माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडूजच्या वृक्षदिंडी व आषाढ वारी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार श्री बच्चूभाऊ कडू हे उपस्थित राहिले व विद्यालयात वृक्षारोपन करण्यात आले.विद्यालयाच्या प्रचार्या सौ.सुरेखा गोडसे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच बच्चू भाऊंनी शिवाई शिक्षण संस्था समाजासाठी निस्वार्थ भावनेने जे काम करतीये याचा आनंद वाटला असे प्रतिपादन केले कौतूक केले.

व विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.यावेळी शिवाई शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री रमेश गोडसे (बापू),शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाकी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हातील पदाधीकारी उपस्थित होते.कर्यक्रमाचे आभार न्यू ऑक्यफोर्ड इंग्लिश मेडियम चे प्रिंसिपल तुषार गोडसे सर यांनी मानले.