शिवाई ज्युनिअर कॉलेजच वडूजचा विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम 

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा (दि.1सप्टेंबर) :- 

सातारा जिल्ह्यात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शिवाई ज्युनिअर कॉलेज वडूज ता .खटाव जि. सातारा येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी पै ओंकार देवेंद्र फडतरे तालुक्यात प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा गोडसे मॅडम यांनी .

तसेच शिवाई शिक्षण संस्थेचे न्यू ऑक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिंन्सिपल तुषार गोडसे सर यांनी व शिवाई विद्यालयातील आणि पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन विद्यालय वडूजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सर्वांनी ओंकार फडतरेचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या.