🔸शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन(Organized in association with Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Yuva-Yuvati Sena and Aspire Professional Academy, Chandrapur)
🔹जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन(Appeal to the unemployed youth of the district to take advantage)
✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती(दि .3 जुलै) :- युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींकरीता तलाठी व वनरक्षक या पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज चे आयोजन वरोरा व भद्रावती या तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आले आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने या निःशुल्क टेस्ट सिरीज उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ जुलैपासून नियमित सकाळी १० वाजेपासून वरोरा येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिवालय व भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय येथे टेस्ट सिरीजचे वर्ग चालणार आहेत.
वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरीच्या युवती जिल्हा अधिकारी कु. प्रतिभा माडंवकर यांनी या उपक्रमाचे प्रसारन केले आहे.
युवासेनाप्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचे प्रेरणेने व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुबंई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितलताई देवरुखकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य, हर्षलजी काकडे, युवासेना विभागीय सचिव तथा गोडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, पूर्व विदर्भ सघंटीका व प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे यांचे नेतृत्वात तसेच माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी, जिल्हा सघंटीका (वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी) सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे व जिल्ह्यातील सर्व जेष्ठ (पुरुष,महीला) युवा-युवती पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात युवा-युवती सेने तर्फे “तलाठी व वनरक्षक” पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज घेतल्या जात आहे.
यामध्ये चंद्रपुर जिल्हा व ईतर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनी भाग घेवु शकतात. या करीता युवा-युवती सेनेकडुन आव्हान करण्यात आले आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी प्रा. प्रीती पोहाणे, प्रा. आश्लेषा जीवतोडे, शिव गुडमल, तेजस्विनी चंदनखेडे, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, स्नेहा किन्नाके, भावना खोब्रागडे, महेश निखाडे, मनोज पापडे, प्रज्वल जाणवे, सौरभ खापने, निखिल मांडवकर, राहूल मालेकर, गौरव नागपुरे यांचेसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व युवा-युवती सेनेच्या पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सघंटीका यांनी या उपक्रमाकडे लक्ष देवुन वेळोवेळी मदत करावी. तसेच युवा-युवती सेनेव्दारा नविन पिढीतील सर्व युवा-युवती यांच्या उज्वल भविष्यासाठी युवा-युवती सेनेकडुन भविष्यात सामाजिक व सघंटनात्मक अनेक उपक्रम राबवून जनतेमध्ये वंदनीय हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मराठी माणसाचे हक्क, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण, माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री कार्यकाळातील लोकहितार्थ कामे, कोरोना काळात राज्यात केलेली कामे याविषयीची माहिती व गद्दारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसुन शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण केले.
व त्यावर मा.सुप्रीम कोर्ट यांनी दिलेला न्याय निवाळा या विषयाची संपूर्ण माहिती कुटुंब, घर, गाव ते शाखा, शहर, तालुका, जिल्हा, राज्यात व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या सर्व विंगचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी कटीबध्द राहुन कार्य करावे, असे शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले.