शिवसेना व युवासेना वरोरा तर्फे शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न Shiv Sena and Yuva Sena Varora inaugurated Shiv Rajyabhishek ceremony

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.7 जून) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सरदार पटेल वॉर्ड वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली तसेच प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कुंकूले, शरद यादव शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना शहर प्रमुख संदीपमेश्राम, शिवदूत बंडुजी डाखरे, उपशहर प्रमुख मनिष दोहतरे,जेष्ठ शिवसैनिक अतुल नांदे,उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कुंकूले युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव व युवासेना जिल्हा प्रमुख मनिषजेठानी यांनी केले.

त्यावेळी समस्त शिवभक्तांना अल्पोहार देण्यात आला.त्यावेळी शर्माजी, पियुष जगताप, किरण कामडी,अविनाश गायकवाड, किसन वर्मा, पवन , याकुब शेख, आयान पठाण, अस्मित यादव, अमन वरखडे, मोनू रेड्डी, अस्मित यादव या सर्व शिवभक्तांनी सहकार्य केले.

त्यावेळी वरोरा शहरातील समस्त शिवभक्त, शिवसैनिक उपस्थित होते.