शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य जनसेवा सप्ताह

🔹विविध सामाजिक उपक्रम राबविणार : शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा पुढाकार

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहात दि. २७ जुलै २०२४ पासून पुढील एक आठवड्यात शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा / राजुरा विधानसभा क्षेत्र) यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने यापूर्वी जिल्हयात तलाठी व पोलीस भर्ती परीक्षेची पुर्वतयारी करण्याच्या द्दष्टीने इच्छूक युवक – युवतींसाठी टेस्ट सिरीज राबविण्यात आली. या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी होऊन ज्यांची या पदासाठी निवड झालेली आहे. अश्या युवक -युवतींचा सत्कार करण्यात येईल.

सध्या सर्वत्र सुरु असलेल्या पाऊसांमुळे पिडीत जनतेला आधार व सहकार्य करण्यात येईल. दिव्यांग बांधवांना नि : शुल्क सायकल वाटप करण्यात येईल. गरीब, गरजू, निराधार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना मदत करण्यात येईल. डोळयांचा आजार असलेल्या ज्या रुग्णांना डॉक्टरांनी डोळयांचे ऑपरेशन सांगितले आहे. अश्या गरजु रुग्णांचे ऑपरेशन सावंगी ( मेघे ) वर्धा येथील दवाखाण्यात निःशुल्क करण्यात येईल.

तरी पक्षाच्या वतीने यापूर्वी राबविलेल्या टेस्ट सिरीज मधील युवक -युवती ज्यांची तलाठी व पोलीस भर्तीत निवड झालेली आहे. पुर पिडीत नागरिक, दिव्यांग बंधू -भगिनींचे पालक गरीब, गरजू, निराधार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिला, डोळयांचा आजार असलेले रुग्ण ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनची शिफारस केलेली आहे. अश्या सर्वांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष कार्यालय शिवालय वरोरा व शिवनेरी भद्रावती येथे आपआपल्या नावांची नोंदणी करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.