शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह” सुरू दिवस तिसरा The third day of the “Jan Seva Week” started on the occasion of Shiv Sena chief Uddhav Thackeray’s birthday

▫️तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत(Financial assistance to disaster victims in assembly area on third day)

 ✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.29 जुलै) :- शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज (दि.२९) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपादग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली.

भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे गोठ्याला आज (दि.२९) च्या रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना ही घटना कळताच रात्रीच वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वत: वैयक्तीक भेट घेतली व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ मदत केली.

या प्रसंगी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मंडळी घटनास्थळी उपस्थित होते.

सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांची घटनास्थळी उपस्थिती होती.

यावेळी वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल अनुक्रमे सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले, हे समजल्यावर त्यांनासुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.