🔸जेष्ठ वयोवृध्द नागरिकांचा सत्कार , सहा दिव्यांगांना साईकील भेट, बत्तीस अनाथ मुलांना घेतले दत्तक , वाचनालयाला पुस्तके दिली भेट
✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.13 ऑक्टोबर) :- स्थानिक श्री मंगल कार्यालय परिसरातील गौरी ग्रीन लॉन येथे आज दि. १३ ऑक्टोंबर २०२३ रोज शुकवार ला सामाजिक सेवेत सदैव तत्पर राहणारे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा- प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी वयाची अंशी पार केलेल्या तेवीस जेष्ठ वयोवृध्द नागरिकांचा सत्कार करण्यात आला, सहा दिव्यांगांना साईकील भेट देण्यात आली., बत्तीस अनाथ मुलांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेण्यात आले , तसेच वाचनालयाला पुस्तके देण्यात आली.
सर्वप्रथम शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी आनंदवन येथील थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या समाधीला भेट देवुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर आनंदनचे विश्वस्त डॉ. विकास आमटे आणि सदाशीव ताजने यांचे शुभाआर्शिवाद घेतले. याप्रसंगी रूपाली रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य भद्रावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या कार्यात वयोवृध्द नागरिकांचे मार्गदर्शन व आशिर्वाद मिळावे यासाठी वयाची अंशी वर्षे पूर्ण केलेल्या तेवीस जेष्ठ वयोवृध्द नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यामध्ये नामदेव बुरटकर, घुलाराम ठवसे, बाबा लांडगे पांडूरंग ताजणे दौलत साखरकर, आनंदराव बदकी, मारोतराव लांडगे, दौलत ढवळे, शंकर गरमडे, लक्ष्मण गोहोकार, शंकर मत्ते, गोविंदा मत्ते, शरद शिंदे, बाबाराव शिंदे, बाबुराव बुरांडे, मधुकर झाडे, चंद्रभागा आस्वले, एकनाथ पारखी, पायघन, शामराव चौधरी, नामदेव वानखेडे, पुरुषोत्तम आस्वले, व माजी सैनिक रामचंद्र नवराते यांचा सहभाग आहे.
सामाजिक बांधिलकी घेत सिमरन वर्मा, कल्याण मोडक, दिव्या बेलखुडे, बेबी तुमाने, अनिल अडूरवार आणि सार्थक उईके ह्या दिव्यांग बंधूभागिनींना तीन चाकी साईकील भेट देण्यात आली.
याप्रसंगी बत्iतीस अनाथ, गोरगरीब आणि गरजवंत विद्यार्थांना शैक्षणीक कार्यासाठी दत्तक घेण्यात आले. यामध्ये श्रृती आत्राम, सोनु धांडे, समिक्षा गारघाटे, अपूर्वा चांदेकर, प्रांजली जीवतोडे, यश तडस, वैष्णवी नागपुरे, नैतिक किटे, जयश्री आत्राम, अंश वादाफळे, भाविका गहुकार, प्रेम तिजारे, नैतिक आमदने, वीर आंबुलकर हिमांशू वाळके, स्वराज गौरकार, अभिमन्यू सचिन, अनमोल सरोटे, पोर्णिमा सिडाम, करण नेहारे, प्रणोती जांभुळे, क्रिष्णा जांभुळे, प्रीती जांभुळे, कल्याणी कुत्तरमारे, शुभम कुत्तरमारे, परी गरमडे, समिर चौधरी, दिपाली गायकवाड, आर्यन रणदिये, विहान शेंबळकर, श्रव्या शेंबळकर आणि फाल्गुन लोहकरे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी जेष्ठ विधितज्ज्ञ तथा चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपूते , सेवा निवृत्त भुमीलेख अधिकारी चंपत आस्वले, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे , सामाजिक कार्यकर्ते मदन ठेंगणे, विजय पिंपळशेंडे , बंडू जांभूळकर, पुरुषोत्तम मत्ते, प्रा. धनराज आस्वले , शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरेकर .
युवा सेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे,उपजिल्हा प्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख तथा न.प. भद्रावतीचे नगरसेवक नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख तथा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता बोरेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले,वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवा सेनेचे अभिजित कुडे.
तालुका संघटीका तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अश्लेषा भोयर, (जिवतोडे), माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, युवती सेना जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर , युवा सेना प्रमुख राहूल मालेकर,शहर संघटीका माया टेकाम,तालुका समन्वयक भावना खोब्रागडे आणि युवती सेना उपजिल्हा अधिकारी शिव गुडमल यांच्यासह वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांचा शुभेच्छा संदेश
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा- निमित्य शिवसेना नेते खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांनी भ्रमरध्वनी वरुन संपर्क साधून शुभेच्छा त्यांना दिल्या. तसेच शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे शिवसैनिक , विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.