🔹तमाम युवासैनिकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे रोहन खुटेमाटे यांचे आवाहन
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि. 12 जून) :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गुरुवार, दिनांक १३ जून रोजी वाढदिवस असून यानिमित्त वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात युवा-युवती सेनेतर्फे पर्यावरण संवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती वरोरा कार्यालय ‘शिवालय’ व भद्रावती कार्यालय ‘शिवनेरी’ येथून सामाजिक उपक्रमांची सुरुवात युवा-युवती सैनिकांच्या उपस्थितीत होणार आहे.
युवा सेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, तथा चंद्रपूर युवा सेना संपर्क प्रमुख सूर्या हिरेकण यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम होणार आहे.
या उपक्रमात चंद्रपूर जिल्हा संघटीका नर्मदा दत्ता बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने, विधानसभा समन्वयक वैभव डहाने, विधानसभा संघटक मंगेश भोयर, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, महिला आघाडी उपजिल्हा महिला संघटीका माया नारळे, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, ज्ञानेश्वर डुकरे, प्रशांत कारेकर, वरोरा उपशहर प्रमुख संजय नरोले, वरोरा महिला आघाडी तालुका प्रमुख सरलाताई मालोकर, भद्रावती महिला आघाडी तालुका प्रमुख आशाताई ताजने, वरोरा शहर प्रमुख शुभांगी अहिरकर, भद्रावती महिला आघाडी शहर प्रमुख मायाताई टेकाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, आदी सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थीती राहणार आहे.
दि. १३ जूनला सकाळी वरोरा-भद्रावती व चिमूर-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. वरोरा व भद्रावती तालुक्यात वृक्षारोपण करण्यात येईल. या निमित्ताने वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गाव शाखांचे उद्घाटन कार्यक्रम तथा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्य होणाऱ्या सामाजीक तथा पक्ष संघटन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन खुटेमाटे, जिल्हा युवती अधिकारी कु. प्रतिभा मांडवकर, युवासेना जिल्हा चिटणीस येसु आरगी, उपजिल्हा युवाधिकारी शरद पुरी, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, विधानसभा चिटणीस उमेश काकडे, तालुका युवाधिकारी वरोरा विकी तावाडे, वरोरा शहर युवाधिकारी प्रज्वल जाणवे.
भद्रावती तालुका युवाधिकारी राहुल मालेकर, भद्रावती तालुका संघटक गौरव नागपूरे, भद्रावती शहर युवाधिकारी मनोज पापडे, जिल्हा समन्वयक युवती सेना तथा भद्रावती बाजार समिती उपसभापती आश्लेषा जिवतोडे, युवासेना विधानसभा, महिला आघाडी शिला आगलावे, महिला समन्वयक भावना खोब्रागडे, प्रा. प्रितीताई पोहाने, महिला आघाडी गायत्री यामलावार, वर्षा आत्राम, मनिषा जुनारकर, उपजिल्हा युवती अधिकारी शिव गुडमल, स्वाती ठेंगणे, युवती विधानसभा संघटक कनिष्का आस्वले, तालुका युवती अधिकारी वरोरा प्रणाली मडकाम, तालुका चिटणीस वरोरा साक्षी वैद्य, शहर युवती अधिकारी तेजस्विनी चंदनखेडे, भद्रावती तालुका युवती अधिकारी नेहा बन्सोड, शहर युवती अधिकारी सिमाताई लेडांगे, फैजल शेख, शुभम कोहपरे, हेमंत शेळकी, शैलेश खिरटकर, सुरज सुर्यवशी, रामानंद वसाके, गौरव नागपुरे, अनिरुद्ध वरखडे, सतिश आत्राम, महेश येरगुडे, विकास कंडे, समिर बलकी, तेजस कुंभारे, गौरव नवघरे, गोपाल पारोधे, साहिल काकडे, गोपाल सातपुते, साक्षी रोकडे, स्नेहा किन्नाके, पुजा कुळसंगे, ज्योती पोयाम, सोनल सालेकर, पुनम सरपाते, पायल कुळसंगे यांनी केलेले आहे.
विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी साहेबराव घोरुडे, पंकज कातोरे, भुमेश वालदे, रवी भोगे, सर्व शाखाप्रमुख गणप्रमुख, गटप्रमुख, आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिदवाक्य ८०% समाजकारण व २०% राजकारण यास अंगिकारून व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे तथा युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून शेकडो युवा सैनिकांची जनसेवा सुरू राहील. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना भेळसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी, ग्रामीण भागातून शहरात प्रवास करताना जाणाऱ्या अडचणी, शैक्षणिक मार्गदर्शन, व्यसनापासून परावृत्त होणे, करीअर गाईडंस, संस्कारक्षम युवा घडविने आदी युवकांच्या कल्याणासाठी व उत्थानासाठी काम केल्या जात आहे.